Mind & Mood Clinic

Neuro-Psychiatry | Deaddiction | Sexology | Counseling

नैराश्य / उदासीनता लक्षण in मराठी

 

नैराश्य कोणालाही येउ शकते श्रीमंत- गरीब, स्त्री-पुरूष, लहान मुले ते वृद्ध. नैराश्य जीवनाच्या सर्व घटकांवर प्रभाव करते. छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टीपासून ते करिअरवर परिणाम होतो. नैराश्य हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये व्यक्तीस नेहमी उदास व निराश वाटते व दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील इंटरेस्ट कमी होतो.

लक्षणे कुठली- १. सतत उदास/ निराश वाटते किवा सतत चीडचीड होणे. २. थकवा येणे, शक्ति नसल्यासारखे वाटते. ३. भूक कमी लागते, जेवणाची इच्छा न होणे किंवा वजन कमी होणे. काही लोकांमध्ये मात्र विरूध्द लक्षणे दिसू शकतात.. ४. झोप न लागणे किंवा शांत व पुरेशी झोप न लागणे. काहीजणाना मात्र खूप झोप लागणे असाही त्रास होऊ शकतो. ५. कामावरती लक्ष न लागणे/ इच्छा कमी होणे, निर्णयक्षमता कमी होणे. ६. आपण काहीच कामाचे नाही, आपले काहीच चांगले होणार नाही, आपल्याला कोणीही मदत करू शकणार नाही असे वाटते ७. आत्महत्येचे विचार मनात येणे किंवा प्रयत्न करणे. 8. दुर्घटनेनंतर काही दिवस उदास, निराश वाटणं स्वाभाविक आहे. पण प्रत्येकवेळी असं घडायलाच हवं असं नव्हे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat